निगडी

पिंपरी चिंचवड मधील संस्कार जत्रेत निगडी येथील शिवभूमी प्राथमिक शाळा चमकली..!

पुणे खबर वृत्तसेवा दि.१९ जानेवारी २०२५

पिंपरी चिंचवड परिसरात जानेवारी महिन्यात राबवली जाणारी संस्कार जत्रा यांचे सर्वेसर्वा मोहन गायकवाड नेहमीच विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळवून देतात. त्या कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धा इथे घेतल्या जातात आणि या स्पर्धेत निगडी परिसरातील शिवभूमी विद्यालयातील विद्यार्थी भाग घेत असतात यावर्षीही पुष्कळ मुलांनी स्पर्धेत सहभाग घेऊन शाळेला बक्षीस प्राप्त केले. ८ जानेवारीला झालेल्या चित्ररंगभरण स्पर्धेत तसेच मॅथ मस्ती आणि हस्ताक्षर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांनी भरघोस यश मिळवले .यातील वैयक्तिक नृत्य मध्ये इयत्ता पहिलीतील सई जोशी हिने दुसरा क्रमांक मिळवला तर श्रीमद्भगवद्गीता बारावा श्लोक म्हणून इयत्ता पाचवीतील आरती यादव हिने प्रथम क्रमांक पटकावला वक्तृत्व स्पर्धेमध्ये इशिता फडतरे इ २ री हिने तृतीय क्रमांक मिळवला.तसेच वेशभूषा स्पर्धेत इयत्ता पहिलीतील काव्या पाटोळे हिने दुसरा क्रमांक तर श्लोक तिकोडे (१ली )व इ २ री तील देशमूख सारंग या दोघांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले . रांगोळी स्पर्धेत सुंदर रांगोळी काढून इ ६वीतील विस्वजा जाधव हिने दुसरा क्रमांक पटकवला आणि समूहनृत्य स्पर्धेमध्ये गणेशगीत या गाण्यावर नृत्य करून इ १ली २री च्या गटातून या नृत्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले वरील सर्व स्पर्धेत शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या शाळेतील उपक्रमशील तंत्रशिक्षिका लेखिका कवयित्री योगिता कोठेकर या दरवर्षी विद्यार्थ्यांना बाह्य स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहित करत असतात त्यासाठी त्या स्वतः विद्यार्थ्यांचे पाठांतर घेतात त्यांना मार्गदर्शन करतात त्या स्पर्धेला घेऊन जातात आणि विद्यार्थ्यांना उत्तेजन देतात त्यांच्याही कष्टाचे चीज होण्यासाठी संस्कार जत्रेचे आयोजक गायकवाड सरांनी साऊथचे सिने कलाकार देवसिंह गिल, शिक्षण आयुक्त शेखर सिंग पोलिस आयुक्त यांच्या उपस्थित सन्मानचिन्ह व पुष्प देऊन सन्मानित केले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पाटील यांना आदर्श मुख्याध्यापकांचा पुरस्कार यांना देण्यात आला त्यामुळे उपक्रमशील शिक्षिका कवयित्री योगिता कोठेकर व मुख्याध्यापकांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. पुढील वर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी आपले कला गुण सादर करतील अशी खात्री पालकांनाही वाटत आहे नक्कीच यातून उद्याचे कलाकार निर्माण होतील यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button