ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मुख्य कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

(आकुर्डी प्रतिनिधी)
१५ ऑगस्ट २०२५
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मुख्य कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पुणे जिल्हा उपाध्यक्ष माननीय रज्जाक भाई शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्ल्ड ऑफ मदर सोसायटीचे सचिव मोहन क्षीरसागर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय रघुनाथ रोकडे उपस्थित होते.

कार्यक्रमाला संघटनेचे सर्व पदाधिकारी,सदस्य तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सोलापूर जिल्हा जनसंपर्क अधिकारी संजय पवार, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अनंत बोडके, संघटनेचे सल्लागार व पत्रकार श्रीधर जगताप, देहू रोड शहर उपाध्यक्ष शफी सय्यद, सचिव जाकीर सय्यद, पुणे जिल्हा जन संपर्क अधिकारी तानाजी मेंगोलकर, फारुख शहा, प्रकाश मासेकर, साजिद शेख, धैर्यसिद्धी साप्ताहिकाच्या मुख्य संपादिका प्रतिमा शिंदे, प्रकाश माने, राजेंद्र काळभोर, रवींद्र मोडक, माणिक जाधव, अजय पाटील, भावना कदम, प्रवीण जावदकर, अनिल समिंदर, महेश सोनकांबळे सचिन जोगदंड आदींचा समावेश होता.

या प्रसंगी मान्यवरांनी देशासाठी बलिदान दिलेल्या महान वीरांना विनम्र अभिवादन केले आणि स्वातंत्र्याचे महत्त्व सांगणारे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांनी केले होते.