सामाजिक

विधवा भगिनी आणि गरजुंना कपडे,फराळ वाटप,आगळी वेगळी भाऊबीज साजरी !

स्नेहदीप जनकल्याण फाऊंडेशनचा उपक्रम

पुणे प्रतिनिधी दि:२६ ऑक्टोबर

स्नेहदीप जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने २०० विधवा,एकल स्त्रिया,गरजू भगिनीना साडी चोळी,मुलांना नवीन कपडे व दिवाळी फराळासाठी लागणारे साहित्य देऊन आगळी वेगळी भाऊबीज दिवाळी आधीच साजरी करण्यात आली.ज्येष्ठ उद्योजक आणि कोहिनूर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक कृष्णकुमार गोयल,पूना मर्चंट्स चेंबर चे अध्यक्ष रायकुमार नहार,स्नेहदीप जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.प्रकाश भंडारी,साई सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण भंडारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम २४ ऑक्टोबर रोजी पूना मर्चंट्स चेंबर(मार्केट यार्ड)येथे झाला.हा कार्यक्रम पुणे मर्चंट चेंबरच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. दिवाळीच्या निमित्ताने, जेंव्हा सर्व जण प्रकाशाच्या झगमगाटात आणि गोड पदार्थांच्या मेजवानीत आनंद साजरा करत असतात, तेंव्हा या दुर्लक्षित कुटुंबांच्या घरी आनंदाचे किरण आणण्यासाठी स्नेहदीपने दिवाळी भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन केले. श्री. गोयल या उदात्त कार्याने खूप प्रभावित झाले आणि स्नेहदीपच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि प्रकल्पातील सर्व लाभार्थींना आशीर्वाद दिले.

स्नेहदीप जनकल्याण फाउंडेशन ही समाजसेवेसाठी समर्पित स्वयंसेवी संस्था आहे.डॉ.प्रकाश भंडारी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली स्नेहदीप जनकल्याण फाउंडेशन गेली ३८ वर्षे हे कार्य करीत आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली. संस्था आरोग्य,शिक्षण,बाल-युवक-महिला विकास,सर्वांगीण विकास आणि सामाजिक सुधारणा यांसाठी प्रयत्नशिल आहे.संस्थेला समाजाने तन-मन-धनाने सहकार्य करावे आवाहन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button