नालंदा बुद्ध विहार, राहुलनगर, निगडी येथे वर्षावास समारोप समारंभ संपन्न.

पुणे खबर,
दि. २२ ऑक्टोबर २०२५
निगडी: नालंदा बुद्ध विहार, राहुलनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, निगडी येथे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्यांच्या कालावधीत आयोजित वर्षावास कार्यक्रमाचा समारोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारतीय बौद्ध महासभा, पिंपरी-चिंचवड, जिल्हा फ विभाग अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात दररोज भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथाचे वाचन, विश्लेषण आणि प्रवचन मालिका घेण्यात आली.समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम पटेकर होते.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा, पिंपरी-चिंचवड जिल्हा कोषाध्यक्ष आयु. रामचंद्र आचलकर गुरुजी, वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी-चिंचवड सरचिटणीस संजीवनी कांबळे, उपाध्यक्ष धनंजय कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे राजू गायकवाड, सावित्रीबाई फुले विहाराचे अध्यक्ष अमर साळवे गुरुजी, भारतीय बौद्ध महासभा फ विभाग कार्यालय सचिव बुद्ध भूषण अहीरे, विश्वशांती बुद्ध विहार वार्ड शाखा अध्यक्ष गुलचंद बनसोडे, अंभोरे गुरुजी, शिरसाठ , तक्षशिला बुद्ध विहाराचे सागर सूर्यवंशी, सतीश शिंदे, रोहित जाधव, राकेश रंधवे, हर्षदीप आचलकर, सुमित साबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात ग्रंथवाचन अश्विनी शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सरस्वती वाव्हुळे यांनी केले, तर सुनंदा खरात आणि राणी शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले. हा समारोप समारंभ उपासक-उपासिकांमध्ये धम्मविषयक जागरूकता वाढवण्यासाठी आणि बौद्ध तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.



