Latur

प्रामाणिकपणाचा आदर्श: हणमंत पितांबर लोखंडे यांचा पोलिसांकडून सत्कार

लातूर, दि. 28 एप्रिल 2026 — प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण घालत ऑटो रिक्षाचालक हणमंत पितांबर लोखंडे (ऑटो क्रमांक: MH 24 AT 1281) यांनी आपल्या रिक्षामध्ये सापडलेला अनोळखी प्रवाशाचा पर्स सुरक्षितपणे परत केला. या स्तुत्य कार्याबद्दल त्यांचा लातूर शहर वाहतूक पोलिसांकडून सत्कार करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 एप्रिल रोजी लातूर बस स्टँड परिसरात लोखंडे यांच्या ऑटो रिक्षामध्ये एका प्रवाशाचा पर्स राहून गेला होता. त्या पर्समध्ये रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती. प्रामाणिकपणे व जबाबदारीने वागून त्यांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेत पर्स परत केला.

या कार्याची दखल घेत वाहतूक शाखा, लातूर शहरचे पोलिस निरीक्षक एम. डी. केंद्रे यांच्या हस्ते लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रामाणिक व आदर्श वर्तनाचे कौतुक करण्यात आले.या घटनेमुळे समाजात सकारात्मक संदेश पसरला असून नागरिकांकडून हणमंत लोखंडे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button