देहूरोड

शिवस्मारक समिती व शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्ष पदी सागर लांगे यांची निवड

पुणे खबर वृत्तसेवा

देहूरोड: येथील शिवस्मारक समिती व शिवजयंती महोत्सव समिती देहूरोड शहर यांची रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी बैठक संपन्न झाली,या बैठकीत शिवजयंती उत्सव २०२५ अध्यक्ष पदी सागर लांगे यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष पदी चंद्रकांत दाभोळे,खजिनदार रमेश जाधव,सेक्रेटरी दिलीप शिंदे, कार्याध्यक्ष सुनील गायकवाड, उपाध्यक्ष शशिकांत सप्पागुरु, उपसेक्रेटरी लालचंद शर्मा यांची निवड करण्यात आली.या बैठकीस संजय पिंजण, दिपक चौघुले, हिरामण साळुंके, बाळासाहेब जाधव, विशाल दांगट, धनराज शिंदे आणि देहूरोड शहरातील शिवभक्त उपस्थित होते.

सागर लांगे हे देहूरोड शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते ज्यांना शिवाजी महाराजांच्या विचारांशी जोडलेल्या कार्यासाठी ओळखले जाते. त्यांनी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शिवस्मारक समिती व शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड, त्यांच्या नेतृत्व क्षमता आणि समर्पणाचा पुरावा आहे.शिवस्मारक समिती व शिवजयंती महोत्सव समिती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे संरक्षण आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आयोजनातून त्यांच्या विचारांना आणि कार्याला जनमाणसापर्यंत पोहोचवणे हे या समितीचे प्रमुख काम आहे. सागर लांगे यांच्या नेतृत्वाखाली या समितीला नवीन ऊर्जा आणि दिशा मिळण्याची आशा आहे.

सागर लांगे यांचे उद्गार

ही निवड माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे आणि मी या जबाबदारीचा सम्मान करण्यासाठी तयार आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांना आणि कार्याला पुढे नेण्यासाठी मी सर्वसामान्यांच्या सहकार्याची अपेक्षा करतो,असे सागर लांगे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button