आम आदमी पार्टी वाहतूक संघटनेच्या उपाध्यक्षपदी अंगद मुगळे यांची नियुक्ती.

पिंपरी, दि. २० जुलै २०२५
आम आदमी पार्टी वाहतूक संघटनेच्या उपाध्यक्षपदी अंगद मुगळे यांची निवड शनिवार, दि. १९ जुलै २०२५ रोजी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित नियुक्तीपत्र व पक्षप्रवेश कार्यक्रमात ही निवड अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली.

या कार्यक्रमात आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या हस्ते अंगद मुगळे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वाहतूक संघटनेचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंगद मुगळे यांनी आपल्या निवडीनंतर पक्षाच्या कार्यप्रणालीप्रती निष्ठा ठेवत वाहतूक क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांसाठी लढा देण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमात पक्षवाढ, संघटन बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला.’आप’चा झेंडा संपूर्ण शहरात फडकवण्याचा संकल्प सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.यावेळी पक्षाचे महासचिव सचिन पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष वैजनाथ शिरसाट, प्रवक्ते सुरेश गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. अनिल रॉय ,उपाध्यक्ष चंद्रमणी जावळे व संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.पक्षाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
ही नियुक्ती होताच मित्र परिवाराकडून अंगद मुगळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



