पुणे न्यूज

तुळशीबाग व्यावसायिक परिवाराने केले सामूहिक लक्ष्मी पूजन

पुणे प्रतिनिधी: (दि.२ नोव्हेंबर २०२४)पुण्य नगरीतील नामांकित ऐतिहासिक तुळशीबाग येथील शेकडो पथारी व्यावसायिक, दुकानदार,तसेच स्थानिक रहिवाशी आणी कामगार वर्ग यांनी एकत्र येऊन सामुहिक पूजन केले.

या उपक्रमाची सुरुवात छोटे व्यावसायिक असोसिएशन तुळशीबागचे ट्रस्टी सागर सुनील दहीभाते यांनी काही वर्षी पूर्वी छोट्या स्वरुपात केली होती. संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ धावडे, संघटनेचे सरचिटणीस अरविंद तांदळे,सागर गुळुमकर, आकाश देसाई, नरेश माळवे,मयूर शेळके,अलका नवगिरे,राजेश सनके, दिनेश दहीभाते,पिंटू बिरादार यांनी आयोजन केलें.पूजेसाठी संपूर्ण तुळशीबागेत हजारो पणत्या, फुलांची आरास,रांगोळी काढून आकर्षक सजावट करण्यात आली होती.दिव्यांमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता.व्यापाऱ्यां बरोबर येणार्‍या ग्राहकांनी सुद्धा या दीपउत्सवाचा मनसोक्त आनंद घेतला.महिलांना आणी लहान मुलांना फोटो काढण्याचा मोह आवरत नव्हता.

याबद्दल आणखीन माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ धावडे म्हणाले ,’जर आपण संघटना म्हणून काम केले आणि एकमेकांशी एकरूप राहिलो तर आपण जीवनात यशस्वी होतो. त्याच वेळी, जर आपण एकमेकांना सोडून एकटे काम करण्याचा प्रयत्न केला तर आपण अपयशी ठरतो.एकत्र पूजन करून व्यापाऱ्यांची एकमेकांशी बांधीलकी आणखीन मजबूत करण्याचा यामागील उद्देश आहे.

सामूहिक लक्ष्मीपूजा ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची पूजा असून, लक्ष्मी हे संपत्ती, सुख आणि समृद्धीची देवी मानली जाते.अशा सामूहिक पूजेमुळे केवळ आर्थिक समृद्धीच नव्हे, तर समाजात एकात्मता, एकोप्याचे वातावरण निर्माण होते.या माध्यमातून आपल्या समाजात सहकार्य, आणि प्रेम वृद्धिंगत होते. लक्ष्मीपूजेच्या माध्यमातून संपत्ती, समृद्धी, आणि शांतीची प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करणे हे एक श्रेष्ठ कार्य आहे आणी हे कार्य प्रत्यक्षात उतरवण्याचे काम आमच्या तुळशीबाग परिवारातील युवा नेतृत्त्व ,पुणे महानगरपालिका शहर फेरीवाला समिती सदस्य सागर दहीभाते यांनी केले त्याचा अभिमान प्रत्येक तुळशीबाग परिवारातील सदस्यांना आहे असे मत संघटनेचे सरचिटणीस अरविंद तांदळे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button