एम. बी. कॅम्प येथे मुस्लिम विकास विचार मंचच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

पुणे खबर दि. २६ जानेवारी २०२६
देहूरोड | प्रतिनिधी
मुस्लिम विकास विचार मंचच्या वतीने एम. बी. कॅम्प येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रभक्ती च्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अन्वर अली शेख व आसिफ सय्यद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस रफिक शेख व सुभान शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक १६ च्या नगरसेविका सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेंद्र तरस यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी उपस्थित नागरिकांनी राष्ट्रगीताला मानवंदना दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्लिम विकास विचार मंचचे अध्यक्ष रज्जाक शेख यांनी केले. राजेंद्र तरस यांनी आपल्या मनोगतात संविधान, समता, न्याय व बंधुतेच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत सर्व समाजाने एकोप्याने राष्ट्र उभारणीत सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी मलिक शेख, आसिफ सय्यद, गफूर शेख, जाहिद शिकीलकर, राजेश राऊत, अमोल राऊत, जिरेन नाडार, निजाम शेख, यासीन खान, सचिन जोगदंड, हुसेन शेख, हमीद शेख, महम्मद सय्यद, करीम शेख, अमन शेख, शोयब सय्यद यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




