देहूरोड

देहूरोड येथे रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संस्थेच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

पुणे खबर
​दि. २६ जानेवारी २०२६

देहूरोड:- येथील रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संस्थेच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
​महापुरुषांना अभिवादन व प्रतिमा पूजन
​कार्यक्रमाची सुरुवात संविधानाला वंदन करून करण्यात आली. मुस्लिम विकास विचार मंचचे अध्यक्ष रज्जाक शेख व संजय शेंडे यांच्या हस्ते संविधान शिल्पास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम बागल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
​भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस बाबू हिरमेठकर यांनी, तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस सामाजिक कार्यकर्ते विलास हिनुकले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
​ध्वजारोहण सोहळा
​कार्यक्रमाचा मुख्य सोहळा म्हणजेच ध्वजारोहण, श्रीमती नारायण देवी अगरवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वर आगरवाल यांच्या हस्ते संपन्न झाला. तिरंग्याला सलामी देत उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीत गायले.
​मान्यवरांची उपस्थिती
​या सोहळ्याचे आयोजन रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी रिक्षा संघटनेचे विजय जाधव, राजू सिंह, सलीम शेख, प्रदीप सोनार, शंकर दोडमणी, आकाश थोरात, सलमान रफिक, किरण वाल्मिकी, दयानंद गायकवाड, लक्ष्मण वाघमारे, सुरेश कांबळे, भास्कर पांडे, मनोज पांडे, रफिक अब्बासअली शेख, प्रकाश लोखंडे, डेव्हिड दास, राजू भाद्रा, सुभान शेख, संतोष ढमाले, सुरेश कांबळे आणि विजय महाळगी यांच्यासह अनेक सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन रफिक लालसाब शेख यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button