देहूरोड

राष्ट्रीय उत्सव समितीच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी.

पुणे खबर
देहूरोड, २३ जानेवारी २०२६
महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२९वी जयंती आज पराक्रम दिवस म्हणून देशभरात साजरी होत असताना, देहूरोड शहरात राष्ट्रिय उत्सव समितीच्या वतीने हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि आदराने साजरा करण्यात आला. शुक्रवारी दि.२३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता सुभाष चौक, मुख्य बाजारपेठ, देहूरोड येथे पार पडला. यावेळी नेताजींच्या पुतळ्यास सुनिल गायकवाड आणि कांती पारेख यांच्या हस्ते हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास श्रीमती नारायण देवी अगरवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वर अगरवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, ज्यामुळे कार्यक्रमाला अधिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व प्राप्त झाले.या कार्यक्रमाचे आयोजन रेणु नारायण रेड्डी आणि अमोल व्यवहारे यांनी केले होते. यावेळी देहूरोड व्यापारी असोसिएशन अध्यक्ष आशिष बंसल ,ॲड. कृष्णा दाभोळे, इंद्रपाल सिंग रत्तू , मिक्की कोचर,तसेच देहूरोड शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

नेताजींच्या अमर विचारांचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या देशभक्ती, त्याग आणि ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’ या उद्गाराने प्रेरित होऊन एकजुटीने अभिवादन केले. हा कार्यक्रम स्थानिक स्तरावर नेताजींच्या आदर्शांना जिवंत ठेवण्यासाठी आणि युवा पिढीला प्रेरणा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button