देहूरोड

पत्रकार इम्रान शेख यांची ‘दैनिक पुढारी’च्या देहूरोड शहर वार्ताहरपदी नियुक्ती.

मुस्लिम विकास विचार मंचकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार.

पुणे खबर दि. १६ डिसेंबर २०२५
देहूरोड: येथील युवा पत्रकार इम्रान शेख यांची प्रतिष्ठित वृत्तपत्र ‘दैनिक पुढारी’च्या देहूरोड शहर वार्ताहरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल आणि या महत्वपूर्ण निवडीबद्दल मुस्लिम विकास विचार मंचच्या वतीने (रविवार) दि.१४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.


इम्रान शेख यांच्या नियुक्तीमुळे देहूरोड परिसरातील घडामोडींना प्रभावीपणे वाचा फोडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मुस्लिम विकास विचार मंचचे अध्यक्ष रज्जाक शेख आणि अन्वरअली शेख यांच्या हस्ते इम्रान शेख यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


यावेळी हुसेन शेख, गफूर शेख, गौस सुनार, जाहिद शिकीलकर, अन्वर शेख (टेलर), शफी सय्यद, साजिद शेख, आणि अंनिस शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


इम्रान शेख यांच्या या नवीन जबाबदारीमुळे देहूरोड शहरातील सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक बातम्यांना योग्य प्रसिद्धी मिळेल, असा विश्वास मुस्लिम विकास विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button