देहूरोड

‘राष्ट्रीय मानव रत्न पुरस्कार’ विजेते एम. डी. चौधरी यांचा सत्कार.

देहूरोड (पुणे), दि. १४ डिसेंबर २०२५: मानवी हक्कांच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल नुकतेच ‘राष्ट्रीय मानव रत्न पुरस्कार’ प्राप्त झालेले ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांचा आज देहूरोड येथे मुस्लिम विकास विचार मंचच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

रविवार दिनांक १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित या समारंभात मंचचे अध्यक्ष रज्जाक शेख आणि हुसेन शेख यांनी चौधरी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यावेळी चौधरी यांच्या मानवी हक्कां साठीच्या अथक प्रयत्नांचा विशेष गौरव करण्यात आला आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये बहुजन संघटक चॅनलचे संपादक राहुल खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच फरहद अत्तार, गफुर शेख, जाहिद शिकीलकर, अन्वरअली शेख, गौस सुनार, साजिद शेख यांच्यासह इतर मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.एम.डी. चौधरी यांचा हा सन्मान समाजातील विविध घटकांना एकत्रित करून मानवतेच्या मूल्यांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्रोत ठरला आहे. मुस्लिम विकास विचार मंचने हा कार्यक्रम आयोजित करून सामाजिक एकतेचा उत्तम संदेश दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button