Crime news

तळवडे येथील महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तांत्रिक तपासाद्वारे देहूरोड पोलिसांकडून अटक.

देहूरोड दिनांक : १४ नोव्हेंबर २०२४ (देहूरोड प्रतिनिधी)

फिर्यादी महिला ह्या तळवडे येथील एका सोसायटी जवळ मार्निंग वॉक करीत असताना एका अनोळखी इसम, वय अंदाजे २५ ते ३० वर्षे अंगात काळसर रगांचे जर्कीन/जॅकेट व लाल रंगाची टोपी याने त्यांचा पाठलाग करून पाठीमागुन येवुन अचानकपणे हाताने गळा आवळला असता त्यास फिर्यादीने विरोध केल्याने त्यांना धक्का देवुन जमीनीवर पाडले. त्यानंतर त्याने फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशना एका हाताने जोरात गळा दाबुन दुसऱ्या होताने तोंडावर मारहाण करून जखमी करून त्यांचा विनयभंग केला अशा प्रकारे तक्रार प्राप्त झाली होती अनोळखी इसमा विरुध्द फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून देहूरोड पो.स्टे. गुरजि नं.५१६/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१),७४,७८ (२),११५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर महिले संबंधीत गंभीर गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या आदेशाने देहूरोड पोलीस ठाणे येथील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे दोन विशेष पथक तयार करून आरोपीचा शोध घेणेबाबत आदेशीत करण्यात आले होते.

नमुद गुन्ह्याचे घटनास्थळ परिसरातील सुमारे २० ते २५ सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून तसेच तांत्रीक तपास करून आरोपीस निष्पन्न केला.

तसेच पोलीस अंमलदार किरण खेडकर, प्रशांत माळी व केतन कानगुडे यांनी अथक परिश्रम करून आरोपी नामे अनिश थुलासी, वय २८ वर्षे, सध्या रा. तळवडे, पुणे मुळ रा. किझाटिंगल (पार्ट) तिरूअनंतापुरम केरळ यास कॅनबे जंक्शन जवळुन शिताफीने ताब्यात घेतले व त्याचेकडे देहूरोड पोलीस ठाणेकडील तपास पथकाने अधिक कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने दाखल गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली.

नमुद आरोपीची पोलीस कोठडी रिमांड मिळवुन देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो, श्री. विनयकुमार चौबे सोो, मा. पोलीस सह आयुक्त श्री. शशीकांत महावरकर साो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ श्री. विशाल गायकवाड सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग श्री. सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय वाघमारे, श्री. विजयकुमार वाकसे, पोनि गुन्हे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोहन धोत्रे, पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोलीस अंमलदार किरण खेडकर, बाळासाहेब विधाते, प्रविण माने, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, युवराज माने, शुभम बावनकर, खंडु विरणक, मोमीन शेख यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

आवाहन

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया मार्फत
नागरींकाना अहवान करण्यात येते की, आपले सोसायटी व परिसरामध्ये जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन घ्यावेत तसेच सोसायटी मध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था नेमण्याची खबरदारी घ्यावी. तसेच रस्त्यावरील कोणत्याही अनुचीत घटनेबाबत माहिती प्राप्त होताच तात्काळ डायल ११२ या पोलीस हेल्पलाईन नंबरवर कळवावे हि विनंती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button