पुणे न्यूज
वक्फ जमिनीच्या संरक्षणासाठी १७ मार्च रोजी पुण्यात होणार आंदोलन.

पुणे दि.१५ ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड या संस्थेच्या वतीने दि.१७ मार्च २०२५ रोजी दिल्ली जंतर-मंतर या ठिकाणी केंद्र सरकारने जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या वतीने वक्फ बिल संदर्भात जे अहवाल सादर केले आहे त्या अहवालाचा विरोध करण्यासाठी दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने सोमवार दि.१७ मार्च २०२५ रोजी आंदोलन होत आहे.
त्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी व तसेच सदरचे बिल केंद्र सरकारने परत घ्यावे. मुस्लिमांची वक्फ जमीन समाजाच्याच ताब्यात राहावे याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी मूलनिवासी मुस्लिम व समविचारी संघटनाच्या वतीने सकाळी ११:३० वाजता वक्फ बोर्ड जमिनीची रक्षा करण्यासाठी ठिय्या आंदोलन करणार आहे.
अशी माहिती अंजुम इनामदार यांनी दिली आहे.



