देहूरोड येथे ‘आंतरजातीय लव्ह मॅरेज एक चिंतन’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.

पुणे खबर १४ ऑक्टोबर २०२५
(देहूरोड प्रतिनिधी,)
प्रकाश कांबळे रुईकर यांनी लिहिलेल्या ‘आंतरजातीय लव्ह मॅरेज एक चिंतन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रमाई विद्यार्थी निवास संकुल, धम्मसदन, शितळानगर, देहूरोड येथे उत्साही वातावरणात संपन्न झाला.

या पुस्तकात लेखकाने आपला सुपुत्र प्रशांत आणि पूनम यांच्या आंतरजातीय विवाहाच्या सत्य घटनेवर आधारित कथना सह क्रांतिकारक महापुरुष, ऐतिहासिक स्थळे आणि देशातील सद्य:स्थितीतील विविध घटनांचा उल्लेख करत प्रबोधनात्मक विचार मांडले आहेत.

प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन आणि उपस्थित मान्यवर
धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के.एच. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. पुस्तकाचे उद्घाटन प्रबुद्धरत्न आचार्य रतनलाल सोनग्रा (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ) आणि ॲड. मनीषा रमेश महाजन (राज्य कायदा व्यवस्थापन विभाग, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती) यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी आर्या महाबोधी मेत्ता, विठ्ठल गायकवाड, प्रा. बाळासाहेब तराळ, डॉ. प्रदीप जोशी, नितीन कर्णे, प्रमोद राजूरकर, प्रितम वाघ, राजाराम अस्वरे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड माजी उपाध्यक्ष अमिन शेख, अमोल नाईकनवरे, प्रकाश चां. कांबळे, एम. झेड. पडवेकर, सुरेश भालेराव, दादासाहेब रणपिसे, संजय तथा अप्पा चव्हाण, भिमराव तराळ, चंद्रकांत गायकवाड, राजेंद्र बडेकर, प्रा. बाळासाहेब धावारे, प्रा. राजू गायकवाड, सु.भा. पवळ, मोहन शिंदे, अनकुल गायकवाड, सुनिल कांबळे, अर्जुन विधाते, प्रवीण साखरे, लिंबाजी कांबळे, विद्याधर घाडगे, मुकुंद कांबळे, भास्कर कांबळे, बजरंग तराळ, कौतुक कांबळे, दत्ता तराळ, दयानंद कांबळे, सुकुमार कांबळे, पवन कांबळे, नंदू कांबळे, पोपट कांबळे, चरण कांबळे, सुशांत घाटगे, राकेश आवाड, पुष्पा कांबळे, नीलम काकडे, आशा गायकवाड, पुष्पा सोनवणे, संगीता बनसोडे, छाया शिंदे, संजीवनी चव्हाण, संगीता गायकवाड, उषा वाव्हळे, विशाखा तायडे, हिराबाई राक्षे, ताराबाई भालेराव, सुरेखा दोडमणी, अश्विनी घाटगे, वंदना कांबळे, मंदाकिनी कांबळे, मानसी कांबळे, राणी हवालदार, सुप्रिया घाटगे यांच्यासह विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी, कोल्हापूर-रुई येथील परिवार आणि सहकारी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धम्मसदनासाठी देणगी
कार्यक्रमा दरम्यान धम्मसदनाच्या बांधकामासाठी प्रा. बाळासाहेब तराळ यांनी १३,५०० रुपये, तर अॅड. अशोक रुपवते यांनी ५,००० रुपये धम्मदान दिले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परशुराम दोडमणी, जोसेफ पॉल आणि चंदन ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन स्नेहलता कांबळे आणि प्रिती कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकाश कांबळे रुईकर यांनी मानले. छायाचित्रण अशोक शिवशरण आणि अनुसया कांबळे यांनी केले.हा सोहळा सामाजिक प्रबोधन आणि साहित्यिक चिंतनाचा एक उत्कृष्ट संगम ठरला.



