रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, सापडलेला महागडा मोबाईल केला परत.

पुणे खबर वृत्तसेवा दि.१४ मार्च २०२५
देहूरोड:- मामुर्डी येथील रिक्षा चालक सुशांत उर्फ सचिन जोगदंड हे नेहमी प्रमाणे मामुर्डी भागात रिक्षा चालवत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक मोबाईल पडलेला दिसला, त्यांनी तो मोबाईल उचलला काही वेळ त्या मोबाईल वर कोणाचा तरी फोन येईल असे त्यांना वाटले, परंतु कोणाचाही फोन न आल्याने जोगदंड यांनी पत्रकार रजाक शेख यांच्याशी संपर्क साधला,शेख यांनी तो सापडलेला मोबाईल देहूरोड पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगितले, जोगदंड यांनी पोलिस ठाण्यात मोबाईल जमा केल्यानंतर ठाणे अंमलदार यांनी मोबाईल जमा करून घेतला.त्या मोबाईल ची ओळख पटवून मूळ मोबाईल धारकाला देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या हस्ते मोबाईल देण्यात आला. या प्रामाणिक रिक्षा चालकाचा देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे व उपनिरीक्षक लखन कुमार व्हावळे यांनी अभिनंदन केले .वैभव ढाकणे यांना हरवलेला मोबाईल परत मिळाल्याबद्दल मोबाईल बघून खूप आनंद झाला. सचिन जोगदंड यांच्या मुळे मला मोबाईल परत मिळाला, सचिन सारखे प्रामाणिक रिक्षा चालक आजही या जगात आहेत.सचिन सारख्या रिक्षा चालकाचे आभार मानावे तेवढे कमीच असे वैभव ढाकणे म्हणाले.




