बुध्दगया मुक्तीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण.

देहूरोड दि.३ मार्च २०२५
बुध्दगया महाबोधी महा बुध्दविहाराचा ब्राम्हण मुक्त होण्या साठी व महाबोधी महाविहार बुध्दगया १९४९ चा कायदा रद्द करण्यासाठी बौध्द भिख्कु संघाचे आंदोलन सुरु आहे, या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी बुध्दगया मुक्ती साठी एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन डॉ .बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार दि ४ मार्च रोजी सकाळी १० वाजता स्वामी विवेकानंद चौक देहुरोड येथील उड्डाणपुलाच्या खाली करण्यात येणार असल्याची माहिती धर्मपाल तंतरपाळे यांनी पुणे खबर वृत्तवाहिनीला दिली

गेल्या १५ दिवसांपासून बुध्दगया महाबोधी महाविहार आंदोलन देशातील व देशाबाहेरील भिख्कु संघ यांच्या नेतृत्वा खाली चालू आहे,बुध्दगया आम्हा बौध्द समाजासाठी महत्वाचे आहे, चक्रवर्ती सम्राट अशोक राजाने तथागत गौतम बुध्दांचा बुध्द धम्म वाढविला अनेक महाविहाराची व स्तुपाची,लेण्यांची निर्मीती केली,भारतरत्न डॉ बाबासाहेबांनी आम्हाला १९५४ ला बौध्द धम्माची दिक्षा दिली,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या लोकांनीच बौध्द धम्माची दिक्षा घेतली गौतम बुद्धांचे अनेक महत्वाचे स्थळ हे बौध्दांच्या ताब्यात नाही ते मनुवांद्याच्या ताब्यात आहेत, बुध्दगया हे मनुवाद्यांच्या ताब्यातून मोकळे करणे साठी भारतातील व भारता बाहेरील बौध्द भिक्कु हे बुध्दगया या ठिकाणी आंदोलन करित आहेत,भारत देशात हजारो मंदिरे आहेत,ती जर खोदली तर तीथे बुध्द मुर्ती दिसेल राजा सम्राट अशोकाने हजारो बुध्द लेणीची स्थापना केली होती आज त्याठिकाणी सर्व मंदीरे आहेत व पुजाऱ्यांचे पोट भरण्याचा धंदा सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती व सर्व बौध्द समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे, या आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.




