देहूरोड

देहूरोड येथील माई बाल भवन संघाने अंध फुटबॉल प्रीमियर लीगमध्ये पटकावले उपविजेतेपद.

देहूरोड दि. २० जून २०२५
अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या भारताच्या पहिल्या अंध फुटबॉल प्रीमियर लीगमध्ये मामुर्डी, देहूरोड येथील माई बाल भवन (महाराष्ट्र) संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाने उपविजेतेपद मिळवले. या स्पर्धेत मराठा लेजियंट्सच्या अंध मुलींनी आपल्या दमदार खेळाने सर्वांचे लक्ष वेधले.


फायनल सामन्यात महाराष्ट्राच्या मराठा लेजियंट्सचा सामना ग्लोरियस गुजरात संघाशी झाला. अतिशय चुरशीच्या या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी जबरदस्त बचाव करत गुजरातला नियत वेळेत एकही गोल करू दिला नाही. सामना पेनल्टी शूटआउटपर्यंत गेला, ज्यामध्ये गुजरात संघाने विजेतेपद पटकावले. तरीही महाराष्ट्राच्या मुलींचे उपविजेतेपद कौतुकास्पद आहे.
संस्थेचे मधुकर इंगळे यांनी स्पर्धेचे संपूर्ण व्यवस्थापन आणि मार्गदर्शन उत्कृष्टरीत्या सांभाळले. सामन्यात स्टार खेळाडू दीपाली कांबळे जखमी अवस्थेत खेळली, तर भाग्यश्री रुगीने आघाडीवर अप्रतिम खेळ करत संघाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. स्पर्धेच्या नियमानुसार एका वेळी दोनच आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळवता येत असल्याने संघाला आव्हानांचा सामना करावा लागला.


संघातील प्रमुख खेळाडू:
कर्णधार: दीपाली कांबळे
दीपाली पवार
स्वाती माने
भाग्यश्री रुगी
चेतन पटरिया
भुवनेश्वरी
गायत्री मूर्ती
पूजा माळी
गोलकीपर: हर्षदा केरन
प्रशिक्षक: विक्रम सिंग
फिजिओथेरपिस्ट: डॉ. सृष्टी
सहाय्यक डॉक्टर: डॉ. हिरानी (बंगलोर चॅलेंजर)
या यशस्वी कामगिरीबद्दल माई बाल भवन (महाराष्ट्र) संघाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या स्पर्धेने संघाने राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान भक्कम केले असून, भविष्यात आणखी मोठी यश मिळवण्यासाठी नव्याने पावले उचलली जातील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button