सारोळा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त उत्सवमय वातावरणात अभिवादन

सारोळा दि. १ ऑगस्ट २०२५
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त त्यांची जयंती सामाजिक उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब कठारे यांच्या निवासस्थानी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमात लोक आंदोलन न्यास धाराशिव जिल्हाध्यक्ष मनोज खरे, पोलिस पाटील प्रितम कुदळे आणि सामाजिक कार्यकर्ते तात्या रणदिवे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमास बापुसाहेब देडे, राम तोडकर, अमोल शिंदे, धीरज शिंदे, भैरव कांबळे, सागर शिंदे, बाबा साळुंके, सहदेव शिंदे, तात्या भिसे, दयानंद गायकवाड, जावेद सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन अण्णासाहेब कटारे यांनी केले होते.
