देहूरोड

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त देहूरोड येथे कार्यशाळा संपन्न.

देहूरोड, दि. २६ जून २०२५

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त देहूरोड पोलीस स्टेशनच्या वतीने श्री.शिवाजी माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालय,पंडित चाळ,गांधीनगर, देहूरोड येथे आज दिनांक २६ जून २०२५ रोजी सकाळी ११:३० ते १२:३० या वेळेत एक जागरूकता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि त्यापासून होणारे नुकसान याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.


कार्य शाळेदरम्यान, अंमली पदार्थांचे सेवन शरीरावर आणि मनावर कशा प्रकारे घातक परिणाम करते, याबाबत उदाहरणांसह समजावून सांगण्यात आले. तसेच,अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी लहान मुले आणि शालेय विद्यार्थ्यांचा कशा प्रकारे गैरवापर केला जातो आणि त्यांना कसे फसवले जाते, याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थां बाबत जागरूकता निर्माण होऊन त्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी सतर्क राहण्याचा संदेश देण्यात आला.


या कार्यक्रमाला शाळेतील ४८० विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, शिक्षकवृंद, शाळेतील इतर कर्मचारी आणि दामिनी पथक यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे आयोजन देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button