संपादकीय

जहीर पटेल यांची भूमिका असलेले ‘ऊत’ आणि ‘कर्मयोगी आबासाहेब’ मराठी चित्रपट कान्स महोत्सवात.

पुणे खबर वृत्तसेवा. पुणे, दि. १४ जून २०२५

मराठी चित्रपटसृष्टीला अभिमान वाटावा अशी कामगिरी करत, जहीर सिकंदर पटेल यांनी अभिनय केलेले ‘ऊत’ आणि ‘कर्मयोगी आबासाहेब’ हे दोन मराठी चित्रपट यंदाच्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सिनेमाचे नाव उंचावले आहे.


‘ऊत’ हा चित्रपट सामाजिक संदेश आणि संवेदनशील कथानसाठी ओळखला जातो, तर ‘कर्मयोगी आबासाहेब’ हा चित्रपट सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित आहे.जहीर पटेल यांनी या दोन्ही चित्रपटांमध्ये सशक्त अभिनय करत आपली छाप पाडली आहे. त्यांच्या अभिनयामुळे या चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.


कान्स चित्रपट महोत्सवात या चित्रपटांचे प्रदर्शन होणे, हे मराठी चित्रपटसृष्टी साठी आणि जहीर पटेल यांच्यासाठी मोठे यश आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, मराठी चित्रपटांना जागतिक व्यासपीठावर स्थान मिळवून देण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button