देहूरोड

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड पोलीस स्टेशनचा अभिनव उपक्रम.

देहूरोड दि.३० डिसेंबर २०२४

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दारू ऐवजी दूध प्यायला हवे, द दारुचा नव्हे दुधाचा सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत दूध पिऊन करावे, नो व्हिस्की नो बिअर, हॅपी न्यू इअर थर्टी फर्स्ट (३१ डिसेंबर) च्या निमित्ताने व्यसनमुक्ती साठी देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने गरमागरम दूधाचे वाटप ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता टाऊन पोलीस चौकी (हाॅटेल सवाना समोर) देहूरोड येथे वाटप करण्यात येणार आहे.

समस्त देहूरोड करांनी या उपक्रमात सहभागी होऊन तरुण पिढीला नवीन वर्ष साजरे करण्यास कटिबद्ध करावे.असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी केले आहे.

या उपक्रमाबद्दल पुणे खबर वृत्तवाहिनीशी माहिती देताना विजय वाघमारे म्हणाले दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.यामुळे यकृत, हृदय आणि मज्जासंस्था यांना नुकसान होऊ शकते. तर दुध हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.यात कॅल्शियम, प्रोटीन आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. दारू पिऊन नवीन वर्ष साजरे करण्याची प्रथा समाजात रुजली आहे. पण ही प्रथा आरोग्यासाठी हानिकारक असून समाजालाही नुकसान करते. दारूमुळे अनेकदा अपघात, वादविवाद आणि गुन्हे घडतात. दूध पिऊन नवीन वर्ष साजरे करण्याची प्रथा सुरू केल्यास, समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. नवीन वर्ष हे नव्या आशा आणि नव्या उमेदीचे प्रतीक आहे. या दिवशी आपण आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदाने वेळ घालवायला हवा. दारू पिऊन आपण हा आनंद खराब करतो. तर दूध पिऊन आपण निरोगी आणि आनंददायी पद्धतीने नवीन वर्ष साजरे करू शकतो.दूध पिऊन नवीन वर्ष साजरा केल्याने आरोग्य सुधारते,मन शांत राहते, कुटुंब आणि मित्रांसोबत नात अधिक घट्ट होतो.समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होते.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दारू ऐवजी दूध प्यायला हवे, ही एक चांगली सवय आहे. यामुळे आपले आरोग्य चांगले राहील आणि आपण अधिक आनंदी जीवन जगू शकतो. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड पोलीस स्टेशनचा अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button