सामाजिक

देहूरोड येथील हॉस्पिटल मध्ये सत्यनारायणाची महापूजा संपन्न

देहूरोड :- येथील आधार हॉस्पिटल मध्ये गणेशोत्सवा निमित्त रविवारी सकाळी ११ वाजता सत्यनारायणाची महापूजेचा कार्यक्रम संपन्न झाला.येवेळी देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे , उप पोलीस निरीक्षक लखनकुमार वाव्हळ ,प्रशासक ऍड.कैलास पानसरे ,देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी नगरसेवक रघुवीर शेलार ,शिवसेनेचे रमेश जाधव , राष्ट्रवादी काँग्रेसचे मिकी कोचर यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.

यावेळी हिरामण साळुंके ,विनायक जाधव ,तुकाराम जाधव , पत्रकार रज्जाक शेख , रमेश कांबळे,रामकुमार आगरवाल , भद्री घुगे तसेच विजय पवार , आदी मान्यवर उपस्थित होते.आधार हॉस्पिटल मधील अन्य डॉक्टर्स , नर्स व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.आधार हॉस्पिटलचे संचालक डॉ.गणेश राऊत , डॉ.महेश कुदळे यांच्या हस्ते सर्व उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.फुले , शाहू ,आंबेडकर विचार मंच चे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.शेवटी महाप्रसाद देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button