देहूरोड

देहूरोडकरांसाठी अत्यावश्यक १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू करावी :- आशिष बंसल

देहूरोड दि.२७ डिसेंबर २०२४

रुग्णवाहिका ही अशी सेवा आहे जी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना त्वरित वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देते.आजच्या धावपळीच्या जगात,अपघात, आजारपण किंवा इतर कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीची स्थिती कधीही उद्भवू शकते. अशा वेळी, रुग्णवाहिका ही एक जीवन रक्षक सेवा ठरते.आपत्कालीन परिस्थितीत अपघात, हृदयविकार,श्वास घेण्यात अडचण, मळमळ, चक्कर येणे अशा अनेक आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णवाहिकेची तातडीची आवश्यकता असते. जेथे वैद्यकीय सुविधा दूर असतात, तिथे रुग्णवाहिका रुग्णांना जवळच्या रुग्णालयात पोहोचवण्याचे काम करते.देहूरोडकरांच्या आपत्कालीन वेळेला तात्काळ सेवेसाठी शासनाची १०८ कार्डिएक रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी मावळ चे आमदार सुनील शेळके यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) देहूरोड शहर युवक अध्यक्ष आशिष बंसल यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी देहूरोड प्रभारी अतुल मराठे, देहूरोड शहर अध्यक्ष प्रविण झेंडे, जाफर शेख, रिंकू वाल्मिकी, बबलू भुंम्बक, उपस्थित होते.

मिनी भारत अशी ओळख असलेल्या देहूरोड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असताना स्थानिक प्रशासन नागरिकांच्या सोयी सुविधा,आरोग्य सेवा पुरवण्यासाठी उदासीन आहे. शहरातुन राष्ट्रीय महामार्ग , मुंबई पुणे महामार्ग आणि मुंबई देहूरोड बेंगलुरु बाह्यवळण तसेच जलद गतीने मुंबई पुणे अशा प्रवासाची ख्याती असलेला यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, देहूरोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वाढणारी गर्दी या सर्व गोष्टींचा विचार करता एखादी दुर्दैवी घटना किंवा अपघात वेळी तातडीने योग्य वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी लागणारी अत्यावश्यक १०८ कार्डिएक रुग्णवाहिका देहूरोड शहर येथे उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या कडे केली आहे.

आपातकालीन व्यवस्थेत जखमींना तातडीची सेवा मिळण्यासाठी देहूरोड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात महाराष्ट्र शासनाकडून २४ तास मोफत मिळणारी १०८ अत्यावश्यक सेवेची कार्डिएक रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.जेणेकरून कोणत्याही वेळी रुग्णांना मदत मिळू शकेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button