साथी सोशल फाउंडेशन व मक्का मस्जिद यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

पुणे खबर वृत्तसेवा
दि.२१ जानेवारी २०२५
देहूरोड :- येथील विकास नगर भागातील मक्का मस्जिद व साथी सोशल फाउंडेशन च्या वतीने दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे रविवार (दि.१९) रोजी आयोजन करण्यात आले आहे, या शिबिरात विद्यार्थी,विद्यार्थिनीनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.करिअर मार्गदर्शन शिबिर हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या शिबिरात मिळालेली माहिती आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची योग्य दिशा निश्चित करण्यास मदत करते दहावी किंवा बारावी झाली की मुलांना कोणत्या क्षेत्रात करियर करायचे हा प्रश्न पडतो अशावेळी चुकीचे मार्गदर्शन मिळाले तर भविष्यात मोठे अडथळे निर्माण होतात म्हणून करियर संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी समाजाने आणि सुशिक्षित नागरिकांनी पुढे यावे या संकल्पनेतून मक्का मस्जिद आणि साथी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच देहूरोड शहरांमध्ये करियर मार्गदर्शनावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती,

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रोफेसर लतीफ शहा, प्रोफेसर महबूब काझी, प्रोफेसर अल्ताफ इनामदार, प्रोफेसर सुरज कुलकर्णी, प्रोफेसर अब्दुल रजाक मुल्ला, प्रोफेसर डॉ शमीम शेख उपस्थित होते, आलेल्या सर्व मान्यवरांनाचे कार्यक्रमा दरम्यान पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी दहावी बारावी तील विद्यार्थी आणि पालक यावेळी उपस्थित होते, करियर निवडताना काही प्रश्न आपण स्वतःला विचारणे गरजेचे आहे. ते म्हणजे मी कोण आहे, माझी तत्वं काय आहेत, मला काय करायला आवडते मला काय करायचे आहे माझ्यात कोणती कौशल्ये आहेत या प्रश्नांची उत्तरे मिळवायला हवीत.ती एकदा मिळाली की नेमके कोणत्या क्षेत्रात जायचे आहे हा कल निश्चित होईल आणि करियर निवडणे विद्यार्थ्यांना सोपे जाईल.असे प्रेरणादायी मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

दहावी बारावीच्या परीक्षा अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत, त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी व उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत सर्वांना यश प्राप्ती व्हावी म्हणून पुणे खबर वृत्तवाहिनीच्या वतीने दहावी बारावी परिक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.




