पुणे न्यूज

बघतोय रिक्षावाला संघटनेचा “बाईक टॅक्सीला” विरोध.

पुणे खबर वृत्तसेवा

दि.१८ जानेवारी २०२५

बघतोय रिक्षावाला संघटनेने पुण्यामध्ये तीव्र आंदोलन करून चक्काजाम केल्यानंतर पुणे सह राज्यातील बेकायदा बाईक टॅक्सी बंद करण्यात आली होती.तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने आंदोलनाची दखल घेऊन सरकारचा बाईक टॅक्सी चालू करण्याचा मानस नसल्याचे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यानंतर कॅब एग्रीगेटर कंपन्यांसाठी राज्याची नियमावली बनवण्यासाठी तसेच बाईक टॅक्सी बाबत विचार करण्यासाठी झा व श्रीवास्तव समितीची स्थापना महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आली होती.सदर समितीने मसुदा तयार करताना आमच्या सहित मुंबईमधील काही रिक्षा व कॅब संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. सदर बैठकीत सर्व संघटनांनी बाईक टॅक्सीला तीव्र विरोध नोंदवला होता.

तरीही सरकारचा बाईक टॅक्सी चालू करण्याचा विचार सुरू आहे.शहराच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे व राज्याच्या परिवहन आयुक्तांकडे अनेक वेळा विचारणा करूनही त्यांनी सदर मसुदा अजून तयार झाला नसल्याचे आम्हाला सांगितले. परंतु आता अचानक पणे राज्याचे परिवहन मंत्री मसुदा तयार झाला असून येत्या काही दिवसात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तो लागू करण्यात येईल अशी विधाने करत आहेत. वास्तविक पाहता तो लागू करण्यापूर्वी नागरिकांच्या प्रतिक्रियांसाठी सार्वजनिक करणे व गरज भासल्यास नागरिकांच्या प्रतिक्रियाच्या अनुषंगाने बदल करून त्यानंतर सदर मसुद्याचे कायद्यात रूपांतर होणे अपेक्षित असते.परंतु ही सर्व प्रक्रिया टाळून जर सदर कायदा मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यास रिक्षा व कॅब संघटनांकडून यापूर्वी केलेल्या आंदोलनापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ.केशव क्षिरसागर यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button