देहूरोड

सेवेसाठी जीवन… संघर्षासाठी समर्पण!

सौ.अर्चनाताई राऊत, वाढदिवस विशेष लेख.

दि.२ ऑगस्ट २०२५

“सत्तेसाठी नाही… सदा तत्पर सेवेसाठी!” हा जणू त्यांचा जीवनमंत्रच आहे. सामाजिक बांधिलकी, कार्यकर्त्यांशी असलेली आपुलकीची नाळ आणि समाजासाठी काहीतरी करण्याची अखंड प्रेरणा यामुळे अर्चनाताई राऊत हे नाव पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्याची ओळख बनले आहे.

दि. ३ ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी उत्सवाचं निमित्तच! एका मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेल्या अर्चनाताईंनी स्वतःच्या मेहनतीवर आणि लोकसंपर्कावर विश्वास ठेवत राजकीय व सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवला आहे. साधेपणा, समोरच्याला समजून घेण्याची क्षमता आणि कोणत्याही परिस्थितीत खंबीर राहण्याची वृत्ती यामुळे त्या लोकांच्या हृदयात विशेष स्थान मिळवून आहेत.

अर्चनाताईंचं संपूर्ण आयुष्य हे समाजसेवेला समर्पित राहिलं आहे. विशेषतः महिला, मुली आणि वंचित घटकांसाठी त्या सतत कार्यरत असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले आहेत,आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मदत, महिला सबलीकरणासाठीचे कार्यक्रम, आणि अनेक ठिकाणी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीची धडपड आजही सुरूच आहे.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्याला राजकीय दिशा दिली आहे. त्या फक्त राजकारणी नाहीत, तर प्रत्येकाच्या दुःखात सहभागी होणाऱ्या एक संवेदनशील कार्यकर्त्या अर्चनाताई आहेत.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा…!

अर्चनाताई राऊत यांना “पुणे खबर डिजिटल मिडिया समूह” च्या वतीने जन्मदिनाच्या व अजून अधिक यशस्वी सामाजिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button