राजगुरुनगर

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” टप्पा क्र. २ स्पर्धेत जिल्हास्तरावर महात्मा गांधी विद्यालयाचा तृतीय क्रमांक.

राजगुरुनगर, दि.१४: खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” टप्पा क्र. २’ स्पर्धेत जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकाविला असून तीन लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम शनिवार (दि.१४) रोजी स्वारगेट येथील श्री.गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे, वैभव घुमटकर, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

पारितोषिक स्वीकारण्यासाठी खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक कैलास सांडभोर, प्राचार्या संध्या कांबळे, विद्यालयातील अधिकारी व शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय यशाबद्दल खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव व सर्व संचालक मंडळाने विद्यालयातील अधिकारी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button