देहूरोड

किवळे हद्दीत शिंदे पेट्रोल पंप ते लेखा फार्म दरम्यान भुयारी मार्ग मंजूर.

धर्मपाल तंतरपाळे यांच्या प्रयत्नांना यश.

पुणे खबर वृत्तसेवा दि.१८ जानेवारी २०२५

देहूरोड:- विकासनगर किवळे येथील शिंदे पेट्रोल पंप ते त्याच्या समोर असलेल्या उत्तम नगर देवी वन आणि लेखा फार्म हाऊस कडे जाण्यासाठी नागरिक आपला जीव मुठीत धरून राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जात असतात त्यात शालेय विद्यार्थी नागरिक तसेच लग्न या सारख्या विविध समारंभासाठी लेखा फार्म कडे तसेच आयटी कामगार हे धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडत होते.त्यात सण २०२३ प्रर्यंत सुमारे दीडशे निष्पाप लोकांचा बळी गेला आहे.याची अधिकृत माहिती देहूरोड पोलीस स्टेशन कडुन धर्मपाल तंतरपाळे यांना मिळाली.आणि हे लक्षात घेऊन धर्मपाल तंतरपाळे यांनी २०१४ मध्ये याच ठिकाणी आंदोलन केले.त्याची दखल शासनाकडून घेतली गेली नाही.त्यानंतर सातत्याने विकासनगर किवळे गावचे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने अनेक आंदोलने केली.रास्ता रोको,धरणे आंदोलन,जेल भरो आंदोलन,अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन,उपोषण,भर उन्हात रस्त्यावर झोपणे,मशाल मोर्च्या अशा विविध मार्गाने अनेक वेळा आंदोलने केली,आणि त्यांच्या मागणीला यश प्राप्त झाले. भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण भारत सरकार यांनी या भुयारी मार्गास मंजुरी दिली असून या संदर्भात मुख्य महाप्रबंधक क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडून सदर ठिकाणी ४ मिटर रुंदीचे भुयारी मार्ग तयार करण्यास मान्यता मिळाली असून त्यासाठी २१ कोटी ,७१ लाख ४८ हजार १०१ रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.अशी माहिती फुले शाहू आंबेडकर विचार मंच चे संस्थापक अध्यक्ष आणि मोर्चे सम्राट धर्मपाल तंतरपाळे यांनी शनिवार ( दि.१८ ) रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.या पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक बाळासाहेब तरस तसेच गोरख ( दादा ) तरस दिलीप तरस आणि नवनाथ तरस अजय बखारीया तसेच विविध वृत्तपत्र,वृत्त वाहिन्यांचे संपादक,प्रतिनिधी उपस्थित होते.भुयारी मार्ग बनवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या कडून हिरवा कंदील मिळाला असून या कामाची निविदाही काढण्यात आली असल्याचे मुख्य प्रबंधक यांनी आंदोलन कर्ते तसेच माजी आमदार अश्विनी जगताप ,तसेच विद्यमान आमदार शंकर जगताप यांना कळवण्यात आले असून निवेदनाच्या प्रतिही त्यांना देण्यात आल्या आहेत.तब्बल चौदा वर्षे संघर्ष केल्या नंतर हे यश प्राप्त झाले असून याचा आनंद आम्हा सर्व आंदोलन कर्ते ग्रामस्थांना झाला असल्याचे यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब तरस यांनी सांगितले. हा भुयारी मार्ग जवळ पास ४ ते ५ मीटर रुंदीचा असून त्यातून चार चाकी लहान मोठी वाहने जाणार आहेत.त्यामुळे आता विकासनगर मधील ग्रामस्थ विद्यार्थी तसेच उत्तम नगर देवी वन किवळे गाव तसेच आयटी कामगार एकूणच पंचक्रोशीतील नागरिकांचा प्रवास सुखकारक होणार आहे.या भुयारी मार्गासाठी एकवीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून याचे श्रेय फुले शाहू आंबेडकर विचार मंच तसेच माजी आमदार अश्विनी जगताप, विद्यमान आमदार शंकर जगताप तसेच विकासनगर किवळे मधील ग्रामस्थांना जाते.लवकरच आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते या भुयारी मार्गाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे धर्मपाल तंतरपाळे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button