देहू-देहूरोड मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी गणेश दुडम यांची निवड.

देहूरोड, दि. ११ जुलै २०२५: मावळ तालुका मराठी पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या देहू-देहूरोड मराठी पत्रकार संघाची नवी कार्यकारणी देहूरोड येथे झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सल्लागार सोनबा गोपाळे गुरुजी, सचिव रामदास वाडेकर तसेच प्रकल्प प्रमुख गणेश विनोदे यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर झाली.
दै. पुढारीचे पत्रकार रमेश कांबळे यांची देहू-देहूरोड मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. नवीन कार्यकारणी खालीलप्रमाणे आहे:
- उपाध्यक्ष: गणेश दुडम
- कार्याध्यक्ष: चैत्राली राजापूरकर
- सचिव: राजेंद्र काळोखे
- प्रकल्प प्रमुख: रामकुमार आगरवाल
- सदस्य: मुकुंद परंडवाल, देवराम भेगडे, सचिन गायकवाड, बद्रीनारायण घुगे, आकाश कानापुरम
या कार्यकारणीचा कार्यकाळ एक वर्षांचा असेल. मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना तालुक्यातील पत्रकारांच्या हितासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी करण्यात आली आहे. देहू-देहूरोड मराठी पत्रकार संघ आता या संघाशी संलग्न झाला असून, पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी कार्य करणार आहे.
मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे यांनी सांगितले की, “पत्रकारांच्या हितासाठी आणि तालुक्यातील सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा संघ कटिबद्ध आहे. नवनिर्वाचित कार्यकारणीला त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो.”
या निवडीमुळे देहू-देहूरोड परिसरातील पत्रकारांना एक नवीन दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




