पिंपरी न्यूज

विठ्ठल नगर येथे उद्या पुण्यानुमोदन दिनाचे आयोजन.

पुणे खबर डिजिटल मिडिया
२१ ऑक्टोबर २०२५

पिंपरी:- नेहरू नगर, विठ्ठल नगर पत्रा शेड एच ए ग्राउंड येथील बुद्ध विहारात उद्या, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता ‘पुण्यानुमोदन दिन’ आयोजित करण्यात आला आहे. या भावपूर्ण कार्यक्रमात पत्रकार दिलीप देहाडे यांचे बंधु ज्ञानेश्वर देहाडे यांच्या स्मृतींना अभिवादन करत श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.या श्रद्धापूर्ण क्षणात प्रिय व्यक्तींच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, या भावनेने हा कार्यक्रम साजरा होणार आहे. शोकाकुल देहाडे परिवार आणि विठ्ठल नगर पत्रा शेड येथील नागरिकांच्या वतीने नातेवाईक, मित्रपरिवार आणि श्रद्धावान मंडळींना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button