देहूरोड

धम्मभूमीच्या ७१ व्या वर्धापन दिनाच्या तयारीसाठी पोलीस ठाण्यात आढावा बैठक.

पुणे खबर
दि.१० डिसेंबर २०२५

देहूरोड : येथील ऐतिहासिक धम्मभूमी येथे २५ डिसेंबर रोजी होणाऱ्या ७१ व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या तयारीसाठी देहूरोड पोलीस ठाण्यात बुधवारी (१० डिसेंबर २०२५) महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीला बौद्ध बांधव,प्रशासकीय अधिकारी,महावितरण विभाग,आरोग्य विभाग, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रतिनिधी, पिंपरी चिंचवडचे अधिकारी, हवेली नायब तहसीलदार देहूरोड सहाय्यक पोलीस आयुक्त उपस्थित होते.

विशेष म्हणजे या बैठकीस विविध जाती-धर्मांचे देहूरोड येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत कार्यक्रमाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियोजन, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा, पार्किंग व्यवस्था आणि एकूण समन्वय यावर सविस्तर चर्चा झाली.

यावर्षीही लाखो अनुयायी धम्मभूमीत दाखल होण्याची शक्यता असल्याने सर्व यंत्रणांनी पूर्ण तयारी ठेवावी, असे निर्देश देण्यात आले.विशेष म्हणजे, केवळ बौद्ध बांधवच नव्हे तर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर धर्मीय नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने हजर राहून “हा कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू,” अशी ग्वाही दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button