ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन च्या वतीने “जागतिक मानवी हक्क दिन” उत्साहात साजरा.

देहूरोड (दि. १० डिसेंबर)
१० डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत आहे जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त दहा डिसेंबर रोजी देहूरोड येथे ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
एम.डी.चौधरी यांनी मानवी हक्क दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या संविधानाने दिलेल्या हक्क,अधिकार, आणि कर्तव्य याची सर्वांनी जाण ठेवून संविधानाने दिलेल्या अधिकाराचा काटेकोरपणाने पालन करावे असे सांगितले.

यामुळे ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन गाडे पाटील, उपाध्यक्ष रज्जाक शेख,संघटनेचे देहूरोड शहर प्रमुख विजय पवार, शफी सय्यद, फारुख शहा, जाकिर सय्यद,द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.रामदास ताटे, मानव आधार सामाजिक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाबू हिरमेठकर, मनसे मावळ तालुका उपाध्यक्ष मोझेस दास, व ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे उपस्थित होते.





