देहूरोड

लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन.

पुणे खबर दि. १३ डिसेंबर २०२५

देहू-देहूरोड: लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त देहू-देहूरोड शहर भारतीय जनता पार्टी मंडळातर्फे आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चौकात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


यावेळी स्वर्गीय मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि स्व गोपीनाथ मुंडे यांच्या वर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचे कार्य, त्यांचे सामाजिक योगदान आणि सामान्य लोकांसाठी त्यांनी घेतलेल्या कष्टांचे स्मरण करून दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देहू-देहूरोड शहर भाजपाचे अध्यक्ष तथा देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड माजी नगरसेवक रघुवीर उद्धवराव शेलार होते.


यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य कैलास पानसरे, पिंपरी चिंचवड शहर शिवसेनाप्रमुख निलेश तरस, विनायका नगरी पतसंस्थेचे अध्यक्ष गुरमीतसिंग रत्तु, माजी अध्यक्ष उमेश जैन, माजी उपाध्यक्ष मदन सोनीगरा, जय गणेश पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार, तसेच जिल्हा उपाध्यक्ष दिलीप राऊत, जया राऊत, तुकाराम नाना जाधव, सूर्यकांत मराठे, कैलास राऊत, सरचिटणीस नारायण तात्या पाचपिंड, सरचिटणीस उमाशंकर सिंग, महिला अध्यक्ष सविता पिंजण, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे, संभाजी टिळेकर, अमित भेगडे, योगेश शेलार, पुणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन भूंबक, सचिव बाबू कोळी, जिल्हा महिला उपाध्यक्षा बॉबी डिका, गोरख तरस यांच्यासह मुंडे साहेबांवर नितांत प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button