देहूरोड ते निगडी मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरू करण्याची मागणी.

देहूरोड प्रतिनिधी दि. ११ डिसेंबर २०२४
देहूरोड ते निगडी मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरू करण्याची मागणी दि.११ डिसेंबर रोजी मावळ चे आमदार सुनील शेळके यांच्या कडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) देहूरोड शहर युवक अध्यक्ष आशिष बन्सल यांनी केले आहे.

या प्रकल्पामुळे अनेक फायदे होऊ शकतात, देहूरोड आणि निगडी या दोन्ही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. मेट्रो रेल्वेमुळे या दोन्ही भागांमध्ये प्रवास करणार्या लोकांना वेळेची बचत होईल. मेट्रो रेल्वेमुळे खासगी वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होईल. मेट्रो रेल्वे ही पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था आहे. यामुळे प्रदूषण कमी होईल. मेट्रो रेल्वेमुळे शहराचा सर्वसमावेशक विकास होईल.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण झालेल्या तीर्थक्षेत्र देहू येथे वर्षातून तीन वेळा लाखो भाविकांच्या मोठ्या यात्रा भरतात, प्रति दिन हजारो भाविक व पर्यटक देहूला येत असतात.तसेच धम्मभूमी, दीक्षाभूमी, चैत्यभूमी असा त्रिवेणी संगम असणाऱ्या देहूरोड येथे ऐतिहासिक धम्मभूमी आहे. त्यामुळे देश विदेशातून लाखो बौद्ध बांधव व पर्यटक देहूरोड ला येत असतात. सर्वांसाठी मेट्रोची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निगडी येथील भक्ती शक्ती पर्यंत मेट्रो सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. लगतच अडीच किमी अंतरावरील देहूरोड पासून मेट्रो प्रकल्पाला सुरुवात करावी, सर्व प्रवाशांना आणि परिसराला फार मोठ्या प्रमाणात लाभ होईल.त्यामुळे लवकरात लवकर देहूरोड पर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध करावी.अशी मागणी मावळ विधानसभा लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या कडे निवेदनाद्वारे युवक अध्यक्ष आशिष बन्सल यांनी केली आहे.यावेळी देहूरोड शहर अध्यक्ष प्रविण झेंडे, देहूरोड प्रभारी अतुल मराठे,जालिंदर राऊत,व युवा कार्यकर्ते जाफर शेख उपस्थित होते.





