गुंजेगाव

अपघातात मृत्यू झालेल्या अयान शेख यांच्या कुटुंबीयांचे खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून सांत्वन

गुंजेगाव (दक्षिण सोलापूर), दि. १ जून : दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथील तरुण अयान कय्युम शेख (वय २०) याचा वाहन अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. १६ मे रोजी घडली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आज दि. ३१ मे रोजी खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी गुंजेगाव येथील त्यांच्या राहत्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, अयान शेख हे १४ मे रोजी सकाळी कामावरून आपल्या गावी परतत असताना गुंजेगावजवळील शिंगोली रस्त्यावर सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.
बेशुद्धावस्थेत सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी रात्री सुमारे ८ वाजता त्याची प्राणज्योत मालवली.

अयान शेख हे सोलापूर रेल्वे स्थानकावर कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते. ते आपल्या कुटुंबातील एकुलते एक पुत्र होते. विशेष म्हणजे, या दुर्दैवी घटनेच्या अवघ्या वीस दिवसांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.

या दुःखद घटनेची माहिती मिळताच खासदार प्रणिती शिंदे यांनी ३१ मे रोजी गुंजेगाव येथे जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन करत धीर दिला व दिवंगत अयान शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

या प्रसंगी शेख परीवार व नातेवाईक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button