देेहूूरोड सेंट्रल ऑर्डनन्स डेपो (COD) त नुुकतेेच झालेल्या दोन्ही निवडणुकीत ‘सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल’चे घवघवीत यश!

कमांडंट ब्रिगेडियर विकांत गंभीर यांनी केेले नवनिर्वाचित उमेदवारांंचे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.
देहूरोड, ( अशोक कांबळे )
सेंट्रल ऑर्डनन्स डेपो (COD) देहूरोड येथील अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या ‘सी ओ डी वर्कर्स को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड (२०२६ – २०३१)’ आःः’सी ओ डी वर्क्स कमिटी (२०२६-२०२८)’ या दोन्ही निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत। यात ‘सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल’ने (सी ओ डी वर्कर्स युनियन आणि सी ओ डी बहुजन कामगार संघ प्रणित) दोन्ही निवडणुकांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करत मोठे यश संपादन केले तर या निवडणूकीत विरोधी पक्ष म्हणून ‘सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी’ (इंटक युनियन व बी एम एस युनियन प्रणित) निवडणुकीच्या रिंगणात होती.
अत्यंत चुरशीच्या वातावरणात आणि कडक शिस्तीत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली.
१) सी ओ डी वर्कर्स को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. निवडणूक (२०२६ – २०३१) अधिकृत निकाल:
सदर निवडणूक मा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. मुकुंद पवार(उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर ६, दापोडी, पुणे) यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडली.
एकूण ११ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत प्रवर्गां नुसार उमेदवारांची अचूक वर्गवारी खालील प्रमाणे आहे:
अ) सर्वसाधारण प्रवर्ग जागा (एकूण ६ जागा):
प्रमोद महादेव मलगेकर – ७८ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)
कपिल भुजबळ – ७४ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)
शब्बीर इनामदार – ७२ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी
अशोक परांडे – ७१ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी – |इंटक)
विलास जगताप – ६९ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)
बाळासाहेब गुंड– ६९ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी –
या प्रवर्गातील इतर उमेदवारांना मिळालेली मते:
व अभिजीत पिसाळ – ६९ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)
किंडरे काळूराम किसन – ६८ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)
विकास मोडक – ६८ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)
संतोष जाधव – ६९ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी)
तानाजी भांडवलकर – ६३ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी)
बाळासाहेब शिळवणे – ५८ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी)
ब) महिला राखीव प्रवर्ग जागा (एकूण २ जागा):
शितल अनिल कुमार कनौजिया – ७७ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)
कोमल प्रवीण आल्हाट– ७६ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)
या प्रवर्गातील इतर उमेदवारांना मिळालेली मते:
कामिनी टिळेकर – ६८ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी वंदना बराथे – ६६ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी)
क) इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्ग जागा (एकूण १ जागा):
सतिश शिंदे – ७४ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)
या प्रवर्गातील इतर उमेदवारांना मिळालेली मते:
(विकास विधाटे – ६८ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी)
ड) अनुसूचित जाती / जमाती (SC/ST) प्रवर्ग जागा (एकूण १ जागा):
सचिन सदाशिव साळवी – ८० मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)
या प्रवर्गातील इतर उमेदवारांना मिळालेली मते:
चारुदत्त महाडिक – ६६ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी)
इ) विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग (VJNT/SBC) जागा (एकूण १ जागा):
अहिल्या दीपक दडस – ७३ मते (सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल)
या प्रवर्गातील इतर उमेदवारांना मिळालेली मते:
महेंद्र कांबळे – ७१ मते (सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी)
२) सी ओ डी डेपो कार्य समिती (Works Committee) निवडणूक (२०२६-२०२८) निकाल:
कार्य समितीच्या निवडणुकीत पक्षनिहाय उमेदवारांची नावे आणि त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत:
पॅनल १: सी ओ डी कामगार स्वाभिमान पॅनल_
श्री. पिल्लई आकाश वासुदेवन – २३१ मते
श्री. डुमडे संजय जगदीश – २२० मते
श्री. भेगडे निलेश हिरामन – २१९ मते
श्री. शितकल संतोष मारुती – २१६ मते
श्री. लीळाकर उमाकांत नारायण – २०९ मते
श्री. टाकळे विक्रम बाळासाहेब – २०१ मते
श्री. बलघरे विकास गोविंद – २०० मते
श्री. कुमार मनीष – १९७ मते
श्री. कुमार अमित – १९० मते
श्री. टिळेकर एकनाथ हिरामन – १९० मते
पॅनल २: सी ओ डी संयुक्त कामगार आघाडी**
श्री. आसबे राहुल पांडुरंग – २२१ मते
श्री. कारेकर निरंजन – २१३ मते
श्री. इनामदार शब्बीर रज्जाक – १९८ मते
श्री. पवार विश्वजीत आर. – १९७ मते
श्री. बुरडे गिरिधर सुदाम – १७४ मते
श्री. नेरकर विलास महादेवराव – १६२ मते
श्री. मठ महेंद्र जी. – १६० मते
श्री. दाभाडे एस. सखाराम – १५७ मते
श्री. झेंडे हिरामन नामदेव – १५३ मते
श्री. लटके महादेव नरहरी १४१वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनाकडून कौतुक व शुभेच्छा
डेपोतील दोन्ही निवडणुका अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पडल्या बद्दल डेपोचे कमांडंट ब्रिगेडियर विकांत गंभीर साह यांनी सर्व कामगारांचे, प्रशासनाचे आणि निवडणूक अधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच नवनिर्वाचित उमेदवारांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
डेपोतील निवडणूक अध्यक्ष अधिकारी कर्नल अखिलेश कुमार साहेब आणि मुख्य निवडणूक अधिकारी मेजर वसंत रंजन यांच्या खंबीर नेतृत्वाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नियमानुसार व चोख पार पडली.

त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानून नवनिर्वाचित उमेदवारांचे अभिनंदन केले.
कामगारांना चांगल्या सुविधा देण्याची सूचना
सोसायटीच्या निवडणुकीत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करतानाच, “सोसायटीच्या हितालाच नेहमी सर्वोच्च प्राधान्य द्या, आगामी काळात सर्व व्यवहार अतिशय चांगल्या प्रकारे चालवा आणि कामगारांना उत्कृष्ट व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्या,” अशी महत्त्वपूर्ण सूचना व अपेक्षा यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

प्रशासनाचे व संघटनांचे आभार
सोसायटीचे मुख्य निवडणूक अधिकारी मुकुंद पवार , निवडणूक अधिकारी बाळकृष्ण घुगे तसेच सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांनी अत्यंत पारदर्शक व उत्कृष्ट नियोजन केले। या.बद्दल डेपोतील सर्व कामगार संघटनांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले। तसेच डेपो प्रशासनाने कायदा-सुव्यवस्था आणि सहकार्य दिल्याबद्दल प्रशासनाचेही आभार मानण्यात आले।
प्रतिक्रिया “हा विजय डेपोतील कामगारांच्या एकतेचा आणि आमच्या पॅनलवर असलेल्या विश्वासाचा आहे. मतदारांनी दिलेल्या या कौलाचा आदर करून आम्ही सोसायटी अतिशय चांगल्या प्रकारे चालवण्यास आणि कामगारांना सर्वोत्तम सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत. निवडणूक शांततेत पार पाडल्याबद्दल प्रशासन व निवडणूक अधिकाऱ्यांचे
संजय जगदीश डुमडे (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य – AIDEF, जे सी एम सदस्य सी ओ डी वर्कर्स युनियन यांनी आभार मानले.




