काँग्रेस पदाधिकाऱ्यांची सिल्लोड येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बैठक संपन्न.

सिल्लोड प्रतिनिधी दि: २७ ऑक्टोबर
आगामी सिल्लोड-सोयगाव विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सिल्लोड व सोयगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक दि.२६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भास्करराव घायवट पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सिल्लोड येथील काँग्रेस कमिटी कार्यालयात घेण्यात आली.सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षालाच ही जागा सुटावी म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांची अपेक्षा होती. अजूनही काँग्रेस पक्षाला या मतदारसंघात जागा सुटेल अशी अपेक्षा आहे, अशी भावना सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली व याबाबत सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविकास आघाडी तर्फे अद्यापही मतदारसंघात उमेदवार जाहीर झालेला नाही. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातर्फे सुरेश बनकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे.परंतु येणाऱ्या २९ तारखेला सर्व पदाधिकाऱ्यांनी सिल्लोड काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्करराव घायवट पाटील यांना फॉर्म भरण्याकरिता आग्रह केला. यावेळी या आढावा बैठकीमध्ये तालुकाध्यक्ष भास्करराव घायवट पाटील यांनी आपल्या भाषणात असे नमूद केले की जर आघाडी तर्फे सुरेश बनकर यांचं नाव जाहीर झाले तर काँग्रेस पक्ष आपली पूर्ण ताकद लावून दिलेला उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून, मेहनत करून निवडणुकीमध्ये प्रचार करू व दिलेल्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणू असे आश्वासन दिले व त्यांच्याविरुद्ध काँग्रेस पक्षाचा उमेदवार अपक्ष फॉर्म भरणार नाही किंवा बंडखोरी करणार नाही अशी ग्वाही दिली.या आढावा बैठकीस जिल्हा सरचिटणीस शेख इकबाल अहमद सर, जिल्हा सरचिटणीस कृष्णा पाटील बावस्कर, सोयगाव तालुकाध्यक्ष राजेंद्र काळे, शहराध्यक्ष दिनेश सिंग हजारी, सिल्लोड शहराध्यक्ष शेख फिरोज, के के जगताप, संजय जाधव, पाचींगे मामा, जाबिर पठाण, रहीम भाई पठाण, ॲड. निलेश काळे, काकासाहेब बडक, पंढरीनाथ ताठे, आनंद दांडगे, वसीम देशमुख, सुनील माकोडे, रमेश कपाटे, प्रमोद कोथे, फिरोज मेवाती, अन्वर पटेल, जिजाबाई अंभोरे, गणेश आर के, कृष्णा जाधव मंगेश कळम, बिस्मिल्ला शहा, रईस पठाण, इरफान शहा, सुधाकर गायकवाड, संघसागर सोनवणे,दिलीप राऊत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



