बारामती

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन.

बारामतीत लँडिंगदरम्यान भीषण क्रॅश; विमानातील सर्व ५ जणांचा मृत्यू.

बारामती, २८ जानेवारी २०२६:

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रमुख नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामती जवळ विमान अपघातात निधन झाले. हे विमान मुंबईहून बारामती कडे जात असताना सकाळी सुमारे ८.४५ वाजता लँडिंग च्या वेळी रनवे वरून घसरले आणि आग लागून पूर्णपणे जळून खाक झाले. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला.अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचारासाठी बारामतीला जात होते. चार्टर्ड लर्नजेट ४५ या विमानात अजित पवार, त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा रक्षक आणि दोन क्रू मेंबर्स (पायलट व सह-पायलट) असे एकूण पाच जण होते. DGCA ने अधिकृतपणे याची पुष्टी केली असून, कोणीही जिवंत राहिलेला नाही.

प्राथमिक माहितीनुसार, बारामती परिसरात दाट धुके आणि हवामान खराब असल्याने विमानाने दुसऱ्यांदा लँडिंग चा प्रयत्न केला असता नियंत्रण सुटले. विमान रनवे वरून घसरून डोंगराळ भागात जाऊन कोसळले आणि लगेच आग लागली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, क्रॅश नंतर ४-५ जोरदार स्फोट झाले आणि आगे चा प्रचंड गोळा झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी तात्काळ सर्व सरकारी कार्यक्रम रद्द केले.
शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार हे कुटुंबीय दिल्लीहून तातडीने बारामती कडे रवाना झाले.
२२ जुलै १९५९ रोजी जन्मलेले अजित पवार हे बारामती मतदारसंघाचे आमदार, अनेकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले. त्यांनी पिंपरी-चिंचवड, पुणे आणि बारामती भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. २०२३ मध्ये त्यांनी काका शरद पवार यांच्यापासून फूट करून NDA सोबत युती केली होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड रिक्तता निर्माण झाली आहे.बारामती आणि संपूर्ण महाराष्ट्र आज शोकमग्न आहे.


पुणे खबर डिजिटल मिडिया समूहाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button